जीएसटी काउन्सिलच्या बैठकीत कपड्यावरील जीएसटीचा दर वाढविण्याचा मुद्दा महत्त्वाचा ठरला. याबाबत सीएनबीसी टीव्ही १८ ने सुत्रांच्या हवालाने दिलेल्या माहितीनुसार जीएसटी परीषदेच्या बैठकीत सर्वसंम्मतीने कपड्यावरील जीएसटी ५ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर वाढविण्याचा निर्णय स्थगित ठेवण्याचा निर्णय झाला. जीएसटीबाबत आगामी भूमिकेबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. पुढील बैठकीत यावर चर्चा होणार आहे.
एक जानेवारी २०२२ पासून टेक्स्टाइल व पादत्राणांवर पाच टक्क्यांवरुन १२ टक्के जीएसटी आकारण्यात येणार होता. राज्य सरकारांसह इतर क्षेत्रातील व्यक्ती, व्यावसायिक, उद्योगांनी याचा विरोध केला होता. त्यामुळे हा निर्णय टाळण्याचे ठरले. परिषदेच्या १७ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत फुटवेअरवरील जीएसटी दरात सुधारणांचा निर्णय झाला होता.