जीएसटी परिषदेची १७ सप्टेंबरला बैठक: कोविडच्या साहित्यावरील दरांचा आढावा घेणार

96

नवी दिल्ली : अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची बैठक १७ सप्टेंबरला लखनौत होणार आहे. या बैठकीत इतर वस्तूंसह कोविड १९शी संबंधित गरजेच्या साहित्याच्या दराबाबत आढावा घेतला जाणार आहे. अर्थ मंत्रालयाने याबाबत ट्वीट केले आहे. अर्थमंत्री सीतारमण या ४५ व्या बैठकीच्या अध्यक्षतेखाली असतील.

जीएसटी परिषदेची यापूर्वी झालेली बैठक १२ जून रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून झाली होती. त्यामध्ये कोविड १९शी संबंधित साहित्यावर कराचे दर ३० सप्टेंबरपर्यंत घटवले होते.

कोविड १९ मध्ये औषधे, रेमडेसिवीर तथा टोसीलीजुमॅबशिवाय मेडिकल ऑक्सिजन आणि ऑक्सिजन कॉन्संट्रेटर या साहित्यावरील जीएसटीच्या दरात कपात केली होती. परिषदेच्या १७ सप्टेंबरला होणाऱ्या बैठकीत राज्यांना महसुलाची नुकसान भरपाई, कोविडच्या साहित्यावरील कर याबाबत विचार विनिमय होणार आहे.

दरम्यान, आर्थिक घडामोडींमधील तेजीमुळे जीएसटीच्या करात १.१२ लाख कोटी रुपये झाले आहे. बुधवारी ऑगस्ट महिन्यात जीएसटी वसुलीची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत यामध्ये ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. सलग दुसऱ्या महिन्यात जीएसटी करवसुली एक लाख कोटी रुपयांवर झाली आहे.
ऑगस्ट महिन्यात १,१२,०२० कोटी रुपये जीएसटी वसुली झाली आहे. यामध्ये केंद्रीय जीएसटी २०,५२२ कोटी रुपये, राज्य जीएसटी २६,६०५ रुपये, एकीकृत जीएसटी ५६,२४७ कोटी रुपये आणि उपकराच्या माध्यमातून ८,६४६ रुपये करवसुली झाली आहे. मात्र, जुलै महिन्यात १.१६ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत या महिन्यात वसुली कमी आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here