आता 40 लाखांपर्यंतच्या वार्षिक कमाईवर जीएसटीतून सूट

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून वस्तू तसेच सेवा कराच्या(GST) करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता 40 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक कमाई करणार्‍या व्यापार्‍यांना जीएसटीतून सुट मिळाणार आहे. तर पूर्वी ही सीमा 20 लाख रुपये इतकी होती. इतकच नाही तर, ज्या व्यापार्‍यांचा टर्नओवर 1.5 करोड रुपयांपर्यंत आहे, ते कंपोजिशन स्कीमचा पर्याय निवडू शकतात. त्यांना केवळ एक टक्का दराने टॅक्स द्यावा लागेल.

वित्त मंत्रालया नुसार, जीएसटी लागू झाल्यानंतर टॅक्सपेयर बेस जवळपास डबल झाला आहे. जेव्हा जीएसटी लागू झाला होता, त्या वेळी जीएसटी कडून कवर करण्यात येणार्‍या एसेसीज ची संख्या जवळपास 65 लाख होंती, जी आता वाढून 1.24 लाख करोड पेक्षाही अधिक झाली आहे. तसेच जीएसटी मद्ये सर्व प्रक्रिया पूर्णपणे स्वचलित आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here