जीएसटी चोरांविरोधात देशभरात 336 ठिकाणांवर छापे, आजपर्यंतचे सगळ्यात मोठे संयुक्त अभियान

114

नवी दिल्ली : जीएसटी रिफंडमधील चोरांना पकडण्यासाठी टॅक्स विभागातील गुप्तचर संघटना डीआरआय आणि डीजीआय यांनी गुरुवारी आतापर्यंतचे सगळ्यात मोठे संयुक्त अभियान चालवले. याअंर्गत जवळपास 15 राज्यात 336 ठिकाणी 1,200 अधिकार्‍यांनी छापे टाकले. या छाप्यामध्ये जीएसटी रिफंडमधला मोठा घोटाळा समोर आला आहे. सुरुवातीला केलेल्या तपासणीनुसार, निर्यातकांद्वारा 470 करोड रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रैडिट जमा करणे आणि त्याचा वापर टॅक्स भरण्यासाठी केला जात होता, हे उघडकीस आले आहे.

सेंट्रल बोर्ड ऑफ इन्डायरेक्ट टैक्सेज एंड कस्टम यांच्या अंतर्गत येणार्‍या डीआरआय आणि डीजीआय च्या अधिकार्‍यांना विशेष सूचना मिळाल्यानंतर दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, तामिलनाडू, पश्‍चिम बंगाल, कर्नाटक, मध्य प्रदेश, तेलंगणा, पंजाब, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि छत्तीसगड मध्ये ही कारवाई करण्यात आली. ही गुप्त माहिती मिळाल्यानंतर दोन्ही गुप्तचर संघटनांनी डायरेक्टरेट जनरल ऑफ एनालिटिक्स एंड रिस्क मैनेजमेंट द्वारा प्रस्तुत केलेल्या आकड्यांचे विश्‍लेषण केले.

या आकड्यांचे विश्‍लेषण करुन निर्यातकांद्वारा भरलेल्या जीएसटी आणि कस्टम यांच्याकडे असणार्‍या निर्यात आकड्यांबरोबर पडताळणी केली. जेव्हा अधिकार्‍यांनी कायद्यानुसार काम पूर्ण केले, तेव्हा आश्‍चर्यजनक घटना समोर आल्या. त्यांना असे समजले की, या निर्यातकांना आणि त्यांच्या वस्तूंना पुरवठा करणार्‍या व्यापार्‍यांनी रोखीत टॅक्स भरला होता.

काही गोष्टीत असेही दिसून आले की, कंपन्यांचे जितके इनपुट टॅक्स क्रेडिट होते, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त टॅक्स त्यांनी आयटीसी च्या माध्यमातून भरला होता. अनेक निर्यातक आणि व्यापार्‍यांनी जवळपास 3,500 करोड रुपयांचे इनवॉइस दाखवून बनावट पद्धतीने 470 करोड रुपयांचा आयटीसी जमा करुन त्या माध्यमातून आयजीएसटी जमा केला.
टॅक्स विभागाच्या गुप्तचर संघटनेला समजले की, काही निर्यातक आयजीएसटी भरण्याबरोबरच वस्तूंची निर्यात करत आहेत. ते बनावट खरेदीवर आयजीएसटी भरत आहेत. इतकेच नाही तर, याप्रकाराने निर्यातीवर भरण्यात येणार्‍या आयजीएसटी रिफंडही त्यांनी घेतला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here