ऊस उत्पादन वाढीसाठी कृषी मेळाव्यातून मार्गदर्शन

हल्दानी : ऊस विकास विभागाने आता आडसाली आणि हंगामी ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मेळावे आयोजित करण्यास सुरुवात केली आहे. ऊस विकास विभागाने कोटखर्रा गावात मेळावा घेतला. ऊस विकास विभागाच्या प्रचार-प्रसार विभागाच्या प्रभारी रिना नौलिया यांनी शेतकऱ्यांना आपले उत्पन्न दुप्पट करण्यासाठीचे उपाय सांगितले. कमी खर्चात अधिक उत्पादन कसे मिळवावे याबाबत त्यांनी काही सूचना केल्या. शेतकऱ्यांनी आपल्या एकूण शेत जमिनीपैकी काही भागात जैविक शेती करुन हळूहळू त्यात वाढ करावी असे त्यांनी सांगितले.

ऊसाच्या नव्याने लावणीसाठीचे उपाय यावेळी सांगण्यात आले. एक डोळा अथवा दोन डोळे कांडी पद्धतीने ऊस लावण, पट्टा पद्धत आदींबाबत माहिती देऊन अशा वेगळ्या पद्धतीने लागणीबाबत प्रोत्साहन देण्यात आले. यावेळी विपिन कुमार, ऊस उत्पादक शेतकरी गोविंद, राजेंद्र, नंदन, दान सिंह, खीम सिंह, रजत, बळवंत, पूरन, केदार, शेरसिंह, रघुवीर, आकाश, चंचल, बहादूर, चंद्र सिंह, हरेंद्र, मोहन, रणधीर आदी उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here