सहारनपूर : केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाचे संचालक डॉ. वीरेंद्र सिंह यांनी विभागातील तीन जिल्ह्यातील शेतांमधील आंतरपिकांची पाहणी केली. उसासोबत पूरक पिके घेऊन आपल्याला उत्पन्नात अतिरिक्त भर घालावी असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. जिल्ह्यातील नंदी फिरोजपूर गावातील शेतकरी पद्मश्री सेठपाल सिंब यांच्या शेतावरील आंतरपिकांची पाहणी डॉ. वीरेंद्र सिंह यांनी केली. त्यानंतर कुरलकी गावातील शेतकरी विकास सिंह यांच्या शेतातील पूरक पिकांची माहिती त्यांनी घेतली. साखर गावातील स्वयंसहाय्यता गटांनी तयार केलेल्या ऊसाच्या रोपांची पाहणी त्यांनी केली.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, डॉ. वीरेंद्र सिंह यांनी शामली जिल्ह्यातील रशीदगढ, महावतपूर तथा बुटराडामध्ये ऊस शेतीची पाहणी केली. त्यांनी ऊस विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, शेतकऱ्यांमध्ये आंतरपिकांबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. आतापर्यंत झालेल्या बैठकांतील कामाचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. डॉ. वीरेंद्र सिंह यांच्या दौऱ्यावेळी सहारनपूर तथा मुजफ्फरनगरचे जिल्हा ऊस अधिकारी डॉ. आर. डी. द्विवेदी, ज्येष्ठ ऊस विकास निरीक्षक इंद्रजीत सिंह, मार्कंडेय मौर्य, संजय सिंह, विनोद, सतीश तथा डॉ. यशपाल सिंह आदी उपस्थित होते.