पुरकाजी : विभागीय विकास कार्यालयात आत्मा योजनेंतर्गत खरीप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. वेद प्रकाश सिंह यांनी शेतकऱ्यांना ऊस पिकाच्या उत्पादनाबाबत नव्या पद्धतींची माहिती दिली. शिवाय, शेतकऱ्यांना ऊस पिकासाठी माती परीक्षण, बिज प्रक्रिया, खतांचा संतुलीत वापर आणि ऊस उत्पादन घेताना किटकांपासून बचाव कसा करावा याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, निवृत्त विशेषज्ज्ञ सेवा राम चौधरी यांनी खरीफ व रबी हंगामाची पिकांसाठी जैविक प्रक्रियेच्या माध्यमातून यशस्वी लागवड करणे, शेतकऱ्यांना रासायनिक खतांच्या वापराने होणारी हानी आणि जैविक शेतीपासूनचे फायदे, पिकांचे कीड व्यवस्थापन याविषयी माहिती दिली. विकास अधिकारी रंजीत कुमार यांनी शेतकऱ्यांना याविषयीची सखोल माहिती आत्मसात करण्याचे आवाहन केले. दुष्यंत त्यागी भैसानी, मनोज चौहान, हरेंद्र सिंह, देव कुमार राठी, आनंद कुमार, नीरज, अश्वनी, अशोक, संजय, परवीन कुमार आदी उपस्थित होते.