गुजरात निवडणूक : भाजपचा विक्रमी विजय, भूपेंद्र पटेल घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

अहमदाबाद : गुजरात विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून भारतीय जनता पक्षाने विक्रमी विजय मिळवला आहे. पक्षाने दणदणीत विजय मिळवत आम आदमी पक्ष आणि काॅंग्रेस पक्षाचा धुव्वा उडवला आहे.

दरम्यान, या ऐतिहासिक विजयानंतर गुजरात भाजपचे प्रमुख सी. आर. पाटील यांनी जाहीर केले की भूपेंद्र पटेल १२ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here