गुजरात: सौराष्ट्रात पावसाचा कहर; अनेक गावे पाण्याखाली

36

सौराष्ट्रामध्ये यंदा मान्सून थांबण्याच्या स्थितीत नाही असे दिसते. नद्या-नाल्यांना उधाण आले आहे. त्यामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. दुसरीकडे प्रशासनाने लोकांसाठी मदतकार्य सुरू केले आहे.

यंदा मान्सूनचा जबरदस्त तडाखा सौराष्ट्राला बसला आहे. क्लयाणपूर तालुक्यातील जाम रावल गाव नेहमीप्रमाणे बुडाले आहे. दरवर्षीप्रमाणे नागरिक या आव्हानाला तोंड देण्यासाठी सज्ज झाले आहेत. प्रशासनाने लोकांसाठी मदतकार्य सुरू केले आहे. द्वारका जिल्ह्यातील कल्याणपूर तालुक्यात ११३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे एनडीआरएफचे पथक लोकांच्या मदतकार्यात गुंतले आहे. नदी आणि समुद्र एकत्र येत असल्याने स्थिती अधिक बिकट बनते. पुरामुळे जिल्ह्यातील नऊ पुलांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. जवळपास २८० लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. अमरेली पोलीस आणि एनडीआरएफच्या टीमने बुधवारी रात्री २१ जणांना बुडण्यापासून वाचवले. तर काली नदीतून काही जणांना वाचविण्यात यश आले. खोखदद नदीत दोन महिला वाहून गेल्या. अनेक गावांमध्ये अद्याप पाणी घुसले आहे आणि लोकांना प्रशासन मदतकार्य करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here