गुजरात, राजस्थानमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, पश्‍चिम मध्य प्रदेश मध्येही होणार मोठा पाऊस

नवी दिल्ली : हवामान विभागा नुसार, आज गुजरात मध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. राजस्थान, पश्‍चिमी मध्य प्रदेश, सिक्किम आणि उत्तर कोकण मध्येही मोठा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्र, आसाम, मेघालय, नागालैंड, मिजोरम, त्रिपुरा, तामिळनाडू आणि पुडुचेरी मध्येही मोठ्या पावसाची शक्यता आहे. राजस्थानच्या काही भागात आज वादळी वार्‍याचीही शंका आहे.

महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भामधील अनेक जिल्ह्यामध्ये पूर आला आहे. यामद्ये नागपूर, चंद्रपुर, भंडारा आणि गडचिरोली सामिल आहेत. मध्य प्रदेशातील चौराई डॅम मधून पाणी सोडण्यात आले आहे आणि दुसरीकडे दोन दिवसापासून संततधार पावसामुळे पूराची परिस्थिती निर्माण झाली आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ रेस्क्यू ऑपरेशन मध्ये लागली आहे. अनेक रस्ते बंद झाले आहेत. अनेक घरांचे आणि शेतांचे नुकसान झाले आहे.

राजस्थानातील अजमेर, भीलवाडा, बांसवाडा, बूंदी, चित्तौडगड सह राज्याच्या पूर्वेकडील अनेक भागात मोठ्या पावसाची, तर पश्‍चिम भागातील बाडमेर, बीकानेर, नागौर जिल्ह्यात आज मोठ्या पावसाची शक्यता आहे. गेल्या 24 तासादरम्यान पूर्व भागात अनेक ठिकाणी आणि पश्‍चिम भागातील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद झाली आहे.

राष्ट्रीय राजधानी मध्ये पुढच्या सहा दिवसांपर्यंत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने रविवारी आपल्या पूर्वानुमानामध्ये याची माहिती दिली आहे. भारतीय हवामान विभागाने सांगितले की, व्यापक स्वरुपात पावसाचा अंदाज नाही, दिल्ली मध्ये ऑगस्टमध्ये आतापर्यंत 236.5 मिमी पाऊस नोंदला आहे. तर या अवधीपर्यंत सामान्य पणे 245.7 मिमी पाऊस पडतो आणि याप्रमाणे पाऊस 4 टक्क्याने कमी झाला आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रविवारी सांगितले की, गेल्या दोन दिवसांपासून होणार्‍या मोठ्या पावासामुळे प्रदेशामध्ये आठ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि विनाशकारी पूराच्या विळख्यात आलेल्या 12 जिल्ह्यातील 454 गावातील 7,000 पेक्षा अधिक लोकांना वाचवण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की, पूरामध्ये अडकलेल्या 40 गावातील जवळपास आणखी 1200 लोकांना काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि वायुसेना सह इतर बचाव दल कर्मचार्‍यांनी या पूरामध्ये अडकलेल्या या गावातील 7,000 पेक्षा अधिक लोकांना सुरक्षित बाहेर काढले आहे.

पश्‍चिमी मध्य प्रदेश च्या इंदौर, उज्जैन. शेजापुर, रतलाम, देवास, झाबुआ, अलीराजपूर, मंदसौर आणि नीमच मध्ये आजही मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे. तवा आणि बरगी बांध ओवरफ्लो होत होते, यासाठी या धरणांचे दरवाजे उघडावे लागले. यामुळे होशंगाबाद मध्ये नर्मदा नदीने धोक्याची पातळी पार केली आहे. यामळे नर्मदेच्या दोन्ही किनार्‍यावर वसलेल्या होशंगाबाद, रायसेन आणि सीहोर या जिल्ह्यामध्ये हाहाकार माजला आहे. अनेक शहर आणि गाव पाण्यात बुडले आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here