गुजरातमध्ये ४४ टक्के पाऊस कमी

अहमदाबाद : गुजरातमध्ये यंदा ४४ टक्क्यांनी कमी पाऊस झाला आहे. मणिपूरनंतर सर्वात कमी पाऊस झालेले हे दुसरे राज्य आहे. मणिपूरमध्ये नऊ ऑगस्टअखेर ५७ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.

टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीने देशाला पाच टक्के हंगामी पावसाची कमतरता असल्याचे दिसून आले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार गुजरातमध्ये एक जूनपासून नऊ ऑगस्टपर्यंत सामान्य सरासरी पाऊस ४५०.७ मिमीऐवजी २५२.५ मिमी झाला आहे. मध्य भारतातील फक्त ओडिशामध्ये २८ टक्के कमी पाऊस झालेले राज्य आहे. तर याऊलट महाराष्ट्रात १० टक्के आणि गोव्यात सरासरी ७ टक्के पाऊस जादा झाला आहे. गुजरात आयएमडीच्या प्रमुख मनोरमा मोहंती यांनी सांगितले की, राज्यात ४४ टक्के कमी पाऊस झाला आहे गुजरातमध्ये गेल्या दोन महिन्यात तीन वेळाच चांगला पाऊस झाला आहे. यादरम्यान, राज्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here