गुंटूर: गुलाब चक्रीवादळाने ऊसासह इतर पिकांचे नुकसान

42

गुंटूर : गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे झालेल्या जोरदार पावसामुळे श्रीकाकुलम, विजयनगर, विशाखापट्टणम, पूर्व गोदावरी, पश्चिम गोदावरी आणि कृष्णा जिल्ह्यातील १ लाख ८४ हजार ५१ एकर क्षेत्रातील पिके पाण्यात बुडाली आहेत. ऊसासह इतर पिकांना मोठा फटका बसला आहे. प्राथमिक अहवालानुसार पश्चिम गोदावरी जिल्ह्यात सर्वादिक ४९,५४९ एकर शेतीमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. तर पूर्व गोदावरी जिल्ह्यातही १५ हजार ६१० एकरातील पिके पुराच्या विळख्यात आहेत. कृषी, बागायती आणि महसूल अधिकारी पूर ओसरल्यानंतर पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतील. एका आठवड्यानंतर सरकारला याबाबत अहवाल सादर केला जाईल. ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे ३३ टक्के अथवा त्याहून अधिक नुकसान झाले असेल, अशा शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे.

कृषी आयुक्त कार्यालयाकडे सादर झालेल्या अहवालानुसार पश्चिम गोदावरी जिल्ह्यात ४९.०३७ एकर भाताचे क्षेत्र, १५ एकरामध्ये मक्क्याचे पीक, २५७.५ एकरातील इतर पिके पाण्याखाली आहेत. विजयनगर जिल्ह्यातील ४०,१७५ एकरातील पिंकाचे नुकसान झाले आहे. यामध्ये २१,९९७ एकर भात, मक्क्याचे १२६९९ एकर आणि कापूस ४९५२ एकर क्षेत्राचा समावेश आहे. अशाच पद्धतीने श्रीकाकुलम जिल्ह्यात ३६,६३५ एकर क्षेत्रात २०,०३३ एकरामध्ये भात शेती, १४,५९० एकरात मका आणि २०२२ एकर इतर पिकांचे नुकसान झाले आहे. विशाखापट्टणम जिल्ह्यात २०,५५१ एकर शेती पाण्याखाली गेली आहे. पुराच्या पाण्यामुळे १८,३७० एकरातील भात, ९८३ एकरातील ऊस आणि ३५५ एकरातील भुईमुग पिराचे नुकसान झाले आहे. कृष्णा जिल्ह्यातही २१ हजार ५३१ एकर शेती पुरात अडकली आहे. जिल्ह्यात ११ हजार ३१३ एकरातील ऊस पिक, ५०५० एकरातील भाताचे पुरामुळे नुकसान झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. पूर्व गोदावरी जिल्ह्यात १५,६१० एकर क्षेत्रात पुराचा फटका बसला आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here