कोरोनाच्या प्रसारामुळे व सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे जोतिबा डोंगरावरील पुजारी वर्गांचे उदरनिर्वाहाचे साधन बंद होते. त्यामुळे त्यांना आधार देण्यासाठी माणूसकिच्या भावणेतून श्री गुरुदत्त शुगर्स (टाकळीवाडी) कडून ५०० कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूच्या किटचे वाटप कारखान्यांचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांच्या उपस्थितीत व महादेव घुमे यांच्या हस्ते करण्यात आले. जोतिबा डोंगर येथिल एमटीडीसी सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमात बोलताना श्री. घाटगे म्हणाले, कोरोना महामारीमुळे सर्व पुजारी वर्गाचे उत्पन्नाचे साधन बंद होते. त्यामुळे जोतिबा युवक क्रांती संघटनेने आमच्याकडे मदतीची मागणी केली. आम्ही गुरुदत्त शुगर्स च्या माध्यमातून तातडीने डोंगरावरील पुजारी वर्गांला जीवनावश्यक वस्तूचे किट देण्याचा निर्णय घेऊन आज त्यांचे वाटप केले. या किट मध्ये तांदुळ ५ किलो, साखर ३ किलो, गव्हु आट्टा ५ किलो, तुरडाळ २ किलो व मिरची पुड २०० ग्रॅम आदी जीवनावश्यक वस्तूचा समावेश होता. सामाजिक कार्यात व नैसर्गिक संकटाच्या वेळी गुरुदत्त परिवार नेहमिच सामाजिक बांधिलकिच्या माध्यमातून समाजाला आधार देण्याचे काम करित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
अडचणीच्या काळात गुरूदत्त शुगर्स ने निरपेक्ष भावनेतून केलेली मदत आम्ही कधीच विसरू शकणार नाही असे जोतिबा युवक क्रांती संघटनेचे अध्यक्ष गोरख बुणे म्हणाले. कार्यक्रमाला ‘गुरुदत्त’एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर राहुल घाटगे, गुरूदेव पुजारी, युवक क्रांती चे पदाधिकारी, ग्रामस्थ व पुजारी मोठया संख्येने उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.