कोरोना वर मात करीत गुरूदत्त शुगर्स ने केला गळित हंगाम पूर्ण

185

कोल्हापुर: गळित हंगाम अंतिम टप्प्यात असताना कोरोना रोगाचा सामना करीत शेतकरी, ऊस तोडणी मजूर, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्या सामुहिक प्रयत्नातून श्री गुरूदत्त शुगर्स ने 6 लाख 63 हजार 818 में.टन ऊसाचे गाळप पूर्ण करून 16 व्या गळित हंगामाची यशस्वी सांगता केलS असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक मा.माधवराव घाटगे यांनी दिली. या कठीण परिस्थितीतून गळित हंगाम पूर्ण करण्यासाठी जिल्हयाचे पालकमंत्री मा.सतेज पाटील यांचे सहकार्य मिळालेबदल त्यांचेही कारखान्याच्या वतीने आभार मानण्यात आले. गुरूदत्त चा पारदर्शक कारभार, उच्चांकी ऊस दर, शेतकऱ्यांची गुरूदत्त वर असणारी विश्वासर्हता आणि कर्मचारी व ऊस तोडणी मजूरांबरोबर कारखान्याचे असणारे दृढ नाते या गोष्टींमुळे सन 2019-20 चा गळित हंगाम यशस्वी पार पडला.

या दरम्यान शासनाच्या आचारसंहितेनुसार कोरोना चा सामना करण्यासाठी कारखाना कार्यस्थळावर अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या गेल्या होत्या. कारखान्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, तोडणी-वहातूक यंत्रणा, यांना मास्क, डेटॉल साबण, सानिटायझर्स तसेच हॅण्डवॉश ची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. तसेच कारखाना परिसर व बैलगाडी अड्डा याठिकाणी नियमितपणे जंतुनाशकांची फवारणी करण्यात येत आहे. वैदयकिय अधिकारी व डिजिटल फलकाच्या माध्यमातून कोरोनाच्या संर्दभात जनजागृती ही करण्यात आली. कारखान्यात प्रवेश करताना सर्वांना सक्तीने हात स्वच्छ धुऊन प्रवेश देण्यात आला. कामगारांचे पंचींग नोंदवताना, कार्यालयिन काम आणि जेवण करताना सोशल डिस्टनिंग चे पालन केले गेले. कोरोना सारखा भयंकर विषाणू बद्दल कारखान्याच्या वतिने ऊस तोडणी मजूरांचे प्रबोधन करून त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या. सर्व प्रकारची काळजी घेतल्या कारणाने त्यांनीही ऊस तोडणी वेळेत पूर्ण केली. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सर्व जिल्हयांच्या सीमा बंद असल्यामुळे सहा हजार ऊस तोडणी मजूरांना आपल्या घरी जाता येत नव्हते व त्यांना कोणतेही काम नसल्याने कारखान्याकडून सामाजिक बांधिलकेच्या भावनेतून पुढील दहा दिवस गव्हू, तांदूळ, डाळ, तेल इत्यादी जीवणावश्यक वस्तूंचे किट पुरवण्यात आले आहे.

संचारबंदी काळात गळित हंगाम अंतिम टप्प्यात असताना कारखाना प्रशासनाला जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक श्रीनिवास घाडगे, प्रांताधिकारी विकास खरात, तहसिहलदार डॉ.अर्पणा मोरे-धुमाळ, डी.वाय.एस.पी. गणेश बिराजदार, डॉ. किशोर काळे, पी.आय. चंद्रकांत निरावडे व दत्तात्रय बोरीगिड्डे, ए.पी.आय. शंकर कुंभार तसेच ग्रामस्तरिय समित्या यांचे सहकार्य लाभल्याबदल श्री.घाटगे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. गळित हंगाम यशस्वी करण्यासाठी एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर राहूल घाटगे, धीरज घाटगे, संचालक जे.आर.पाटील, धोडिंराम नागणे, बबन चौगुले, बाळासाहेब पाटील, संजय गायकवाड व आण्णासाहेब पवार यांनीही परिश्रम घेतले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here