उर्वरित एफआरपी पोटी, गुरुदत्त शुगर्स देणार साखर

1163

 

बातम्या वाचू नका ऐकाही, बातम्या वाचणे झाले एकदम सोपे ,आत्ता बातम्या वाचणे आणि ऐकणे झाले एकत्रच

कोल्हापूर : चीनी मंडी

शिरोळ तालुक्यातील श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेड या खासगी साखर कारखान्याने उर्वरित एफआरपी रकमेसाठी ऊस उत्पादकांना साखर देण्याची तयारी दर्शवली आहे. या संदर्भात जाहीर नोटिस देऊन कारखान्याने साखर नेण्याचे आवाहन केले आहे.

जाहीर नोटिसमध्ये म्हटले आहे की, ऊस पुरवठा करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना कळवण्यात येते की, २०१८-१९मध्ये उत्पादकांनी पुरविलेल्या उसाचे २३०० ऊस बिल अदा केले आहे. ऊस उत्पादकांना उर्वरित रक्कम देण्याचा कारखान्याचा प्रयत्न आहे. सध्याच्या स्थितीमध्ये ती रक्कम देणे अशक्य बनले आहे. उर्वरित एफआरपी देण्यासाठी कारखान्यावर साखर जप्तीची करावाई सुरू आहे.  त्यामुळे उत्पादकांना उर्वरित रक्कम देण्यासाठी बाजारभावाप्रमाणे साखर देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक ऊस पुरवठादाराने लेखी मागणीच्या लिखित नमुन्यासह सात दिवसांच्या आत कारखान्याच्या सर्कल ऑफिसमध्ये जमा करावेत.

दरम्यान, शेतकऱ्याने असा लेखी अर्ज केला नाही तर, कारखाना उपलब्धतेनुसार एफआरपीची उर्वरित देय रक्कम लवकरात लवकर अदा करेल, असेही कारखान्याने स्पष्ट केले आहे.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp  

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here