गुरूदत्त साखर कारखान्याचा आर्दश, शेतकऱ्यांसह ऊसतोडणी मजुरांचे ही हित जोपासले; अध्यक्ष माधवराव घाटगे यांचा सामाजिक उपक्रम

कोल्हापूर, ता. 13 : पश्‍चिम महाराष्ट्रात ऑगस्ट 2019 मध्ये आलेला प्रलयकारी महापूर असो किंवा सध्या ओढवलेल्या कोरोना विषाणू विरुध्दचा लढा असो यामध्ये गुरूदत्त शुगर्स कारखान्याचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांनी सामाजिक कार्यात पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांना न्याय देतानाच गुरूदत्त कारखान्याच्या सहा हजार ऊस तोडणी मजुरांना धान्य व जीवनावश्‍यक वस्तूंचे किट वाटप करुन समाजासमोर एक आर्दश निर्माण केला आहे. शेतकऱ्यांचा सर्व ऊस तोडला आहे. त्यानंतर कोरोनामुळे अडकून पडलेल्या कामगारांनाही मायेचा हात देत त्यांची कुटूंबा प्रमाणे देखभाल केली जात आहे.

राहूल घाटगे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दिवसाचा जनता कर्फ्यु लागू केला. त्यावेळीच मनात शंका आली होती की कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची शक्यता होती. चीनप्रमाणे भारतातही याचा फैलाव सुरू राहिला तर भविष्यात काय परिस्थिती होवू शकेल. याचा अंदाज बांधला होता. याच दरम्यान, आम्ही परदेशात असणाऱ्या मित्र आणि नातेवाईकांशी आम्ही बोललो. त्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी सांगितले की या ठिकाणचे सर्व व्यवहार ठप्प आहेत. सरकारने पूर्ण लॉकडाऊन केले आहे. अशी परिस्थिती भारतात झाली तर गुरूदत्तवर विश्‍वास ठेवून शेतकऱ्यांनी आपल्या शेतात ऊस ठेवला होता. 1 लाख टन ऊस शेतातच होता. तो ऊस कसा गाळप करायचा, अशी चिंता होती.

मुख्य शेती अधिकारी विजय जाधव म्हणाले, शिल्लक राहिलेला ऊस हा प्रश्‍न तर होताच पण कामगारांचे व ऊसतोडणी मजुरांचे संरक्षण कसे करायचे हाही मोठा प्रश्‍न होता. म्हणून , त्यांना जीवनावश्‍यक वस्तूंसह साबण, मास्क, सॅनिटायझरचा पुरवठाही कारखान्याच्यावतीने केला. धान्य, पिण्याचे पाणी, राहण्याची सोयही उपलब्ध करुन दिली. कामगार ज्या ठिकाणी राहतात, त्या ठिकाणी औषध फवारणी करुन घेतली जाते. त्यामुळे ऊस तोडणी मजुरांच्या आरोग्याकडे प्राधान्यांने लक्ष देण्याचे काम गुरूदत्त शुगर कारखान्याकडून केले आहे. तोडणी, वाहतूक, मजूर, शेतकरी, पोलीस, प्रशासनाने खूप मोठी मदत केली आहे. सध्या ज्या परिसरातमध्ये ऊस शिल्लक राहिला आहे. तो अजिबात शिल्लक राखला जाणार नाही, याची खबरदारी कारखान्याकडून घेतली गेली.

मुख्य कार्यकारी अधिकारी उदय पाटील म्हणाले, कारखान्यामध्ये जे प्रवेश करतील त्यांच्यासाठी हॅडवॉश करण्यासाठी व्यवस्था केली आहे. सर्व कामगारांना मास्क दिले आहे. लोकांना सुरक्षिततेची माहिती दिली. सोशल डिस्टन्ससिंग चे महत्व पटवून दिली. त्यानूसार कामगार आणि अधिकारीही कारखान्यात कार्यरत आहेत.

कारखाना परिसरात चौदा गावात जंजूनाशक फवारणी
गुरूदत्त साखर कारखान्याच्या परिसरात येणाऱ्या चौदा गावांमध्ये कारखान्याच्यावतीने जंतूनाशक फवारणी केली जात आहे. याशिवाय, व्हाईट आर्मी पाच फेस्क्यू फोर्स व वजीर रेस्क्यू फॉर्स यांच्यामार्फत गावागावांमध्ये प्रबोधन केले जात आहे. गुरूदत्त शुगरकडून कोरोना प्रतिबंधासाठी विषेश उपाय योजना केल्या आहेत. त्यामुळे कामगारांनी व ऊस तोडणी मजूर आणि कोणताही आळा वेडा न घेता आपल्या कारखान्याचे गाळप पूर्ण केले.

सहा हजार मजूरांना गहु, तांदूळ, डाळ देवून पाठबळ दिले. कोरोनामुळे सर्व जिल्ह्यातील सिमा सिल केल्या आहेत. त्यामुळे कारखाना परिसरातच या कामगारांना त्यांचा चरितार्थ चालवण्याचा आर्दश गुरूदत्त शुगरने करुन दाखवला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here