हालसिद्धनाथ कारखाना निवडणूक : २० जागांसाठी ३४ अर्ज

निपाणी : येथील श्री. हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी ५ सप्टेंबरअखेर अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी आठ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. २० जागांसाठी दोन दिवसांत एकूण ३४ इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत.पहिल्या दिवशी विद्यमान संचालक मंडळातील बहुतेक संचालक आणि काही नवीन इच्छुकांनी खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शुक्रवारी (ता. ८) अर्ज माघारीची प्रक्रिया चालणार आहे. संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकूण २० जागा निवडीसाठी ही निवडणूक जाहीर झाली आहे. मल्टिस्टेट दर्जा मिळाल्याने संचालकांच्या संख्येत वाढ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here