सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने सुरु केली हँड सॅनिटायझरची निर्मिती

कोरोना महामारी चा फैलाव रोखला जावा व त्यासाठी सॅनीटायझर चा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत असल्याने, केंद्र व राज्य शासनाने सहकारी साखर कारखान्यांनी हँड सॅनिटायझर ची निर्मिती करावी असे आवाहन केले होते त्या पार्श्वभूमीवर सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने अहमदनगर जिल्ह्यात सर्वप्रथम हँड सॅनिटायझर ची निर्मिती केली असून हे उत्पादन संजीवनी सॅनीटायझर नावाने बाजारात आणले आहे अशी माहिती अध्यक्ष बिपीन दादा कोल्हे यांनी दिली. याप्रसंगी प्रभारीी कार्यकारी संचालक राजेंद्र सूर्यवंशी, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे ,सुरक्षा अधिकारी प्रकाश डुंबरे आदी उपस्थित होते.

ते म्हणाले की, संजीवनी उद्योग समूहाने नागरिकांच्या प्रत्येक आपत्तीत सातत्याने मदतीची भावना ठेवत सर्वप्रथम सहकार्य दिले आहे. सध्या जगात कोरोना महामारी मुळे अनेक मृत्यू होत आहेत. हा विषाणू संसर्ग प्रादुर्भाव कमी करण्यासाठी संजीवनी उद्योग समूहाने 50 हजार लिटर सोडियम हायपोक्लोराइड जंतुनाशके फवारणी करून काकडी विमानतळासाठी चार सुरक्षा सूट, स्प्रे पंप मोफत दिले असून मतदारसंघातील अकरा प्राथमिक व उप आरोग्य केंद्रांना तसेच खाजगी वैद्यकीय अधिकाऱ्यांना ग्रामीण रुग्णालयाला सुमारे तीन हजार लिटर हँड सॅनिटायझर चा पुरवठा मोफत करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे सोडियम क्लोराइड देखील पुरवलेले आहे.

ही आपत्ती मोठी आहे त्याचे निवारण करण्यासाठी सर्वांचे सहकार्य तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या नॉर्मस प्रमाणे संजीवनी हँड सॅनिटायझर ची निर्मिती करण्यात आली आहे.

सध्या लॉकडाऊन मुळे त्याची निर्मिती करताना खूप अडचणी आल्या. याबाबतच्या परवानग्या तसेच कच्चामाल बुच,रंग, येथे उपलब्ध होत नाही. मुंबईतून हा कच्चामाल मिळवताना कष्ट पडले. कोरोनाला हरवणसाठी या पार्श्वभूमीवर संजीवनी उद्योग समूहाने 10हजार उपरणे, १० हजार मास्क, फळे व भाजीपाला विक्रेते तसेच कष्टाचे काम करणारे मजूर आदींना 20 हजार मास्क, 350 सफाई कामगारांना सुरक्षा सुट, वैद्यकीय अधिकाऱ्यांना तसेच संस्थांनला मोफत वितरीत केले आहे, याचा धोका ओळखून त्यावर नेमकेपणाने काम केले आहे. नागरिकांनी वेळोवेळी मिळणारा सूचनांचे पालन करावे, घराबाहेर पडू नये, वारंवार साबणाने हात स्वच्छ व्हावे, संपर्क कमी करावा, असेही शेवटी कोल्हे म्हणाले.

माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी हँड सॅनिटायझर ची निर्मिती 90, 180, 500ml तसेच एक लिटर व पाच लिटर स्वरुपात बाजारात उपलब्ध करून देण्यात आल्याचेही बिपीन दादा कोल्हे यांनी सांगितले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here