कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्यातही होणार सॅनिटायझरचे उत्पादन

तीर्थपुरी (जि.जालना) : जालना जिल्ह्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याने हँड सॅनिटायझरचे उत्पादन घेण्याबाबत पावले उचलली आहेत. याबाबतचा परवाना अन्न आणि औषध विभागाकडुन बुधवारी (ता.२५) मिळाला असल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक दिलीप पाटील यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाच्या प्रादुर्भावास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हात धुण्यासाठी हँड सॅनिटायझरचा वापर करण्यात येत आहे. कोरोनाने देश सर्वत्र थैमान घातले असल्याने प्रशासन दक्ष झाले आहे या विषाणूपासून बचाव करण्यासाठी हात धुण्यासाठी नागरिक हँड
सॅनिटायझरचा वापर मोठ्या करतात. हँड सॅनिटायझरने हात धुतल्याने जिवाणू नष्ट होतात. त्यामुळे नागरिकाकडून मोठ्या प्रमाणात या हँड
सॅनिटायझची मागणी होत आहे. मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने साखर कारखान्यात या हँड सॅनिटायझरचे उत्पादन सुरू करण्यात यावे अशा सूचना दिल्या आहेत.

त्यामुळे याठिकाणी लवकरच हँड सॅनिटायझरचे उत्पादन सुरू होईल. जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरील नागरिकांना हॅड सॅनिटायझर उपलब्ध होईल. बाजारात १०० मिलीलीटरची पॅकिंग मिळत असले तरी किंमत मात्र जास्त आहे. केंद्र सरकारने साखर कारखान्याला २०० मिलीलीटर हँड सॅनिटायझरची किंमत जास्तीत जास्त १०० रुपये ठेवण्यात यावी या अटीवर परवाना देण्यात आला असल्याचे समजते.

कारखान्याचे उपाध्यक्ष उत्तमराव पवार म्हणाले, कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना हा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असून सामाजिक बांधिलकी म्हणून या ठिकाणी हँड सॅनिटायझर ची निर्मिती करण्यात येणार आहे. या कारखान्याला नुकतीच
परवानगी मिळाली असून लवकरात लवकर कारखाना हँड सॅनिटायझरची निर्मिती करणार आहे.

कारखान्याचे कार्यकारी संचालक दिलीप पाटील म्हणाले, कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्यात हँड सॅनिटायझरची निर्मितीसाठी परवाना मिळाला असून या ठिकाणी इतर लागणारे साहित्य मिळताच हँड सॅनिटायझरचे
उत्पादन सुरू करण्यात येईल. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांची मोठी अडचण दूर होईल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here