साखर कारखाना व्यवस्थापनाला एक आवठवड्यात ऊस थकबाकी भागवण्याचे आदेश

हरिद्वार : सहाय्यक ऊस आयुक्त शैलेंद्र सिंह यांनी साखर कारखाना व्यवस्थापनाला एका आठवड्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत ऊस थकबाकी भगवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जर थकबाकी भगावली गेली नाही तर त्यांच्या विरुद्ध कारवाईचे करण्याचा इशाराही दिला आहे.

सहायक ऊस आयुक्त शैलेंद्र सिंह यांनी ज्वालापुर येथील आपल्या कार्यालयामध्ये ऊस थकबाकीबाबत बैठक घेतली. दरम्यान, इकबालपूर, लिब्बरहेडी आणि लक्सर साखर कारखान्यांकडून ऊस थकबाकी भागवण्याच्या विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली.

ते म्हणाले, सातत्याने सांगूनही ऊस थकबाकी भगावली जात नाही. ज्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यांनी सांगितले, एका आठवड्यात साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांचे पैसे भागवावेत. ज्यामुळे शेतकर्‍यांची आर्थिक अडचण दूर होईल आणि शेती कार्य पुन्हा चालू होईल. बैठकीमध्ये लक्सर कारखान्याकडून पवन ढिंगरा, लिब्बरहेडी कारखान्याचे अनिल कुमार, इकबालपूर कारखान्याचे प्रतिनिधी ओमपाल आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here