ऊस बिले देण्यात हरिनगर साखर कारखाना अग्रेसर

बेतीया : शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे देण्यात विभागातील सर्व कारखाना चांगली कामगिरी करत आहेत. गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये बहुतांश कारखान्यांनी थकबाकी दिली आहे. काही कारखान्यांकडे थोडी थकबाकी आहे. तीही लवकरच मिळेल अशी शक्यता आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार हरिनगर साखर कारखाना ऊस बिले देण्यात अव्वल स्थानावर आहे. २ फेब्रुवारीपर्यंत कारखान्याने ९१.२४ लाख क्विंटल ऊसाचे गाळप केले आहे. त्यापैकी ९९.४३ टक्के बिले दिली आहेत. जवळपास ३ अब्ज रुपयांची ऊस बिले अदा करण्यात आली आहेत. फक्त १ कोटी ७१ लाख रुपयांची बिले अद्याप शिल्लक आहेत.

याबाबत जागरण डॉट कॉमवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, ऊस उद्योग विभागाचे मंत्री प्रमोद कुमार यांनी सांगितले की, ऊस बिले देण्याची स्थिती चांगली आहे. बगहा साखर कारखान्याने ६०.४९ लाख क्विंटल उसाचे गाळप करून ८६.३७ टक्के ऊस बिले दिली आहेत. नरकटियागंज साखर कारखान्याने ६०.२९ लाख क्विंटल उसाचे गाळप करून ९५.३५ टक्के, मझोलिया कारखान्याने ३१.७५ लाख क्विंटल उसाचे गाळप करुन ९२.८० टक्के, लौरिया कारखान्याने २३.५९ लाख क्विंटल उसाचे गाळप करुन ६८.१५ टक्के आणि सुगौली कारखान्याने २३.२६ लाख क्विंटल उसाचे गाळप करून ६८.२८ टक्के ऊस बिले दिली आहेत. गोपालगंज साखर कारखान्याने २२.२० लाख क्विंटल उसाचे गाळप करून ९२.५० टक्के तर सिधवलिया साखर कारखान्याने ३०.१९ लाख क्विंटल उसाचे गाळप करून ८९.४५ टक्के ऊस बिले दिली आहेत. चांगल्या पद्धतीने ऊस बिले मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे बैद्यनाथ ओझा, लाल बहादुर मिश्र, सूर्य नारायण सिंह आदींनी सांगितले. त्यामुळे आगामी हंगामासाठी ऊस लागणीला जोर चढला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here