‘मकाई’ची थकीत बिले न दिल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

सोलापूर : मकाई कारखान्याची थकीत एफआरपी मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली. त्यावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मकाई सहकारी साखर कारखान्याने थकीत ऊस बिले शेतकऱ्यांना ३ जानेवारीपर्यंत न दिल्यास कारखान्याचे तत्कालीन चेअरमन, संचालक मंडळावर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले.

मकाई सहकारी साखर कारखान्याचे २०२२-२३ थकीत ऊस बिल न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी प्रा. रामदास झोळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेतली. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे दशरथ कांबळे, ॲड. राहुल सावंत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र गोडगे, प्रा. राजेश गायकवाड, हरिदास मोरे, अंजनडोहचे माजी उपसरपंच शहाजी माने ‘आदिनाथ’चे माजी संचालक विठ्ठल शिंदे, माधव नलवडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here