ऊस तोडणीसाठी हार्वेस्टरचा वापर : नेपाळने केले भारताचे अनुकरण

188

रौतहाट : भारत आणि इतर ऊस उत्पादक देशांच्या मार्गावर चालताना, नेपाळनेही ऊस तोडणी आणि भरणीसाठी हार्वेस्टर मशीनचा वापर सुरू केला आहे.

नेपाळमध्ये पहिल्यांदाच रौतहाटमध्ये ऊस तोडणी आणि भरणीसाठी हार्वेस्टर यंत्राचा वापर करण्यात आला आहे. रौतहाट येथील कटाहरिया नगरपालिकेजवळील बाबा बैजूनाथ साखर कारखान्याकडून भारतातील पुण्यातून ऊस तोडणीचे हार्वेस्टर आणण्यात आले आहे.

प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, नेपाळ काँग्रेस विभाग २ चे अध्यक्ष कृष्ण प्रसाद यादव यांनी बागमती नदीकाठावर ऊस तोडणी यंत्राचे उद्घाटन केले. यादव यांनी सांगितले की, हार्वेस्टर मशीनच्या वापरामुळे ऊस तोडणी आणि कारखान्यापर्यंत नेण्याच्या कामापासून शेतकऱ्यांची सुटका होईल. कारखान्याचे मालक बैजू बाबरा यांनी सांगितले की, एक मशीन एका तासात साधारणतः २०० क्विंटलपर्यंत ऊस तोडू शकते. आणि हा ऊस वाहनात भरला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here