हरियाणा: ऊस इतरत्र वळविण्याचा आदेश मागे, नारायणगड कारखान्यात गाळप शक्य

83

अंबाला : नारायणगड साखर कारखान्याचा ऊस कर्नाल, शाहबाद आणि यमुनानगर या तीन साखर कारखान्यांना देण्याचा आपला १३ सप्टेंबर रोजीचा आदेश हरियाणाच्या ऊस आयुक्तांनी मागे घेतला आहे. आधीच्या आदेशात ऊस इतरत्र वळवण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.

दी टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, शाहाबाद साखर कारखाना लिमिटेड, पिकाडल अॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड आणि सरस्वती शुगर मिल्स लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात राज्य ऊस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे की, यापूर्वी दिलेला आदेश रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे नारायणगड साखर कारखाना आगामी हंगामात गाळप सुरू करु शकेल अशी शक्यता आहे.

ऊस आयुक्तांचा हा आदेश म्हणजे नारायणगड साखर कारखाना कार्यक्षेत्रातील ७००० ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा ठरणार आहे. दरम्यान अद्याप कारखाना सुरू होईल का याबाबत शेतकरी साशंक आहेत. कारण कर्मचाऱ्यांनी गेल्या १५ दिवसांपासून थकीत वेतन आणि पगारवाढ या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे. कारखाना प्रशासनानेही आर्थिक तरलतेबाबत चिंता व्यक्त केली आहे. अंबालाच्या ऊस उत्पादक शेतकरी संघ समितीचे अध्यक्ष विनोद चौहान म्हणाले, आम्ही साखर कारखाना सुरू करण्याच्या सरकारच्या धोरणाबाबत साशंक आहोत. शेतकऱ्यांचे पिक आणि आधीचे थकीत १०५ कोटी रुपये याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here