हरियाणा : ऊस पिकाची ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन

यमुनानगर : जे शेतकरी सरस्वती साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आहेत, त्या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या ऊस पिकाची नोंद माझे पिक-माझा तपशील या पोर्टलवर करणे आवश्यक आहे, असे सहाय्यक ऊस विकास अधिकारी सूरजभान पोरिया यांनी सांगितले. आपल्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरवर जावून शेतकऱ्यांनी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन त्यांनी केले.

भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सहाय्यक ऊस विकास अधिकारी सूरजभान यांनी सांगितले की, शेतकरी स्वतःसुद्धा गुगल प्ले स्टोअरवरून मोबाईलमध्ये अॅप डाऊनलोड करू शकतात. त्यानंतर त्यांना आपल्या पिकाची नोंदणी करता येईल. या नोंदणीची अंतिम मुदत ३१ जुलै आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जे शेतकरी नोंदणी करीत आहेत, त्यांना १०० रुपये प्रोत्साहन अनुदान दिले जात आहेत. जे शेतकरी आपल्या पिकाची नोंद माझे पिक-माझा तपशील या पोर्टलवर करतील, त्यांना विभागीय स्कीम, अनुदानाचा लाभ देण्यात येईल अशी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपलया पिकाची नोंद करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here