हरियाणा : गहू पिकाचे अवशेष जाळण्यावर बंदी लागू

पुणे : पंजाब आणि हरियाणामध्ये गहू आणि भातपिकाचे अवशेष जाळले जातात. त्यामुळे होणाऱ्या प्रदुषणाचा फटका दिल्लीसह शेजारील राज्यांना बसतो. हवेचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याने हरियाणातील फतेहाबादमध्ये गहू पिकाचे अवशेष जाळण्यावर बंदी घातलण्यात आली आहे. जिल्हा दंडाधिकारी राहुल नरवाल यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. रब्बी पीक हंगाम २०२४ संपेपर्यंत हा आदेश लागू असेल, असे जाहीर करण्यात आले आहे.

याआधी फतेहाबादसह हरियाणात फक्त भातपिक काढणीनंतर उरलेले अवशेष जाळण्यास बंदी होती. मात्र यंदा गहू पीकाबाबत देखील जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेताना बंदी घातली आहे. तसेच एसएसएमएस यंत्रणा नसलेल्या हार्वेस्टर मशीनवर बंदी घालण्यात आली आहे. कापणीसाठी वापरण्यात येणाऱ्या कंबाइन हार्वेस्टर मशीमध्ये सुपर स्ट्रॉ व्यवस्थापन प्रणाली लावण्याच्या सूचना नरवाल यांनी केल्या आहेत. या प्रणालीमुळे प्रदूषण कमी होण्याबरोबरच कोरड्या चाऱ्याची समस्याही उद्भवणार नाही, असेही नरवाल यांचे म्हणणे आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here