हरियाणा : ऊस दर न वाढवल्यास जानेवारीत आंदोलनाचा भाकियूचा इशारा

हरियाणामध्ये सरकारने ऊस दरात वाढ न केल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. भाकियू चढुनी गटाने याप्रश्नी जानेवारी महिन्यात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. युनियनचे अध्यक्ष गुरनाम सिंह चढुनी यांनी व्हिडीओ जारी करत याची घोषणा केली. सरकारने जर ऊस दर वाढवला नाही, तर शेतकरी जानेवारीत आंदोलन करतील. पंजाब सरकारने दरवाढ केली असतानाही हरियाणा सरकारने दरवाढीकडे अद्याप लक्ष दिलेले नाही, असे ते म्हणाले. हरियाणामध्ये ऊस दर प्रती क्विंटल ३६२ रुपये आहे. यापूर्वी राज्याचा ऊस दर देशात सर्वाधिक राहिला आहे. मात्र, आता पंजाबमध्ये ३८० रुपये प्रती क्विंटल दर असून तो देशात सर्वाधिक आहे.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, चढुनी यांनी म्हटले आहे की, यापूर्वी पंजाबमध्ये ऊसाच्या दरात वाढ झाली की, हरियाणामध्ये त्वरीत दरवाढ केली जात होती. मात्र, सरकारने आता असे केलेले नाही. सरकारने अजिबात उशीर न करता ऊस दर ४५० रुपये प्रती क्विंटल जाहीर करावा. याबाबत सरकारला आम्ही निवेदने दिली आहेत. मात्र, त्यावर विचार करण्यात आलेला नाही. मशीनद्वारे ऊस तोडणी केल्यानंतर दरात पाच टक्के कपातीऐवजी ती सात टक्के करण्यात आली आहे. पंजाबमध्ये फक्त तीन टक्के कपात केली जाते. सरकारने ही कपात त्वरीत मागे घ्यावी अशी मागणी चढुनी यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here