हरियाणा : प्रती क्विंटल ४०० रुपये ऊस दर देण्याची शेतकऱ्यांची मागणी

अंबाला : सरकारने उसाचा दर (SAP) प्रती क्विंटल ३६२ रुपये वरून ४०० रुपये प्रती क्विंटल करावा, अशी मागणी हरियाणातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. यावर्षी उसाच्या पिकावर किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. आणि पिकाच्या संरक्षणासाठी कीटकनाशकांवर खूप पैसा खर्च करावा लागला, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष विनोद राणा म्हणाले की, सरकारने ऊस गळीत हंगामासाठी नव्याने एसएपी जाहीर केलेला नाही. पिकाचा उत्पादन खर्च वाढला आहे. आणि त्यामुळे सरकारने कमीत कमी ४०० रुपये प्रती क्विंटल एसएपी जाहीर करण्याची गरज आहे.

नारायणगड साखर कारखान्याची थकबाकी हे शेतकऱ्यांच्या चिंतेचे आणखी एक कारण आहे, असे विनोद राणा म्हणाले. मागील हंगामाची थकबाकी देण्यात कारखाना अपयशी ठरला आहे. गेल्यावर्षी कारखान्याने सुमारे ४६.२६ लाख क्विंटल उसाचे गाळप केले होते. मात्र शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. बीकेयूचे नेते राजीव शर्मा म्हणाले की, नारायणगड साखर कारखान्याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची १६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. आणि काही कोटी रुपयांचे पोस्ट-डेटेड चेकही आहेत. आम्ही नुकतीच कारखान्याच्या अधिकार्‍यांशी बैठक घेतली आहे. त्यांनी गेल्या हंगामातील ऊस बिले १५ डिसेंबरपर्यंत रोख अदा करण्याचे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here