हरियाणा: साखर कारखाने तोट्यातून बाहेर काढण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू

चंडीगढ : साखर कारखाने तोट्यातून बाहेर काढण्यासाठी बगॅस विक्रीसह इतर उपपदार्थांचे उत्पादन वाढविण्यावर भर दिला जात आहे असे हरियाणाचे सहकर मंत्री डॉ. बनवारी लाल यांनी सांगितले. हरियाणा राज्य सहकारी शुगर मिल फेडरेशनच्या वार्षिक आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. ते म्हणाले, याशिवाय साखर कारखान्यांमध्ये ६९० केएलपी इथेनॉल उत्पादनाची प्रक्रिया सुरू केली जात आहे. साखर कारखान्यांमध्ये अनेक उप उत्पादने तयार करण्याची योजना आहे. अधिकाऱ्यांनी या उद्दिष्टांची पूर्तता करण्याची तयारी करावी, पुढील तीन वर्षात सर्व योजना पूर्ण केल्या जातील, असे मंत्र्यांनी सांगितले.

सहकार मंत्र्यांनी सर्व साखर कारखान्यांच्या देखभाल, दुरुस्तीची कामे सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. ऑक्टोबर महिन्यापासून नवा हंगाम सुरू केला जाईल कारखान्याच्या तांत्रिक व्यवस्थापनासाठी हरियाणा कृषी विद्यापीठात प्रशिक्षण घेतलेल्या १५० युवकांची नियुक्ती केली जाईल. साखर कारखान्यात यंदा चांगली रिकव्हरी झाली आहे. शाहबाद, जींद, सोनीपत हे कारखाने यात अव्वल राहिले असे मंत्री बनवारी लाल यांनी सांगितले.

राज्यातील पानीपत, महम, रोहतक आणि असंध साखर कारखान्याच्या रिकव्हरीबाबत अधिकारी भेट देणार आहेत. फतेहाबाद साखर कारखान्यात ऊस येत असल्याने अद्याप गाळप सुरू आहे. उर्वकीत साखर कारखान्यांचे गळीत संपुष्टात आले आहे, अशी माहिती मंत्री बनवारी लाल यांनी दिली. यंदा कारखान्यांनी ४५६.७२ लाख क्विंटल उसाचे गाळप केले. ४३.७३ लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा १४.८६ टक्के अधिक गाळप झाले आहे. याशिवाय ३.७९ टक्के साखर उत्पादन वाढ झाली आहे, अशी माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here