हरियाणा: सहकारी साखर कारखान्यांचे क्लस्टर तयार करून इथेनॉल प्लांट उभारण्याची योजना

चंदीगड : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुविधा देण्यासाठी हरियाणा सरकार प्रयत्न करत आहे. या गळीत हंगामातून ऊस आणण्यासाठी शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवला जाईल, जेणेकरून त्यांच्या ऊसाचे वेळेवर गाळप होईल. हरियाणातील सहकारी साखर कारखान्यांमध्ये नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून उसाचे गाळप सुरू होणार आहे. शेतकऱ्यांना कोणत्या दिवशी कारखान्यामध्ये ऊस आणायचा आहे, याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवर पाठवला जाईल. साखर कारखाने शेतकऱ्यांना १० रुपयांत जेवण उपलब्ध करून देतील.

दैनिक जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सहकारमंत्री डॉ. बनवारीलाल यांनी मंगळवारी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत सांगितले की, यंदाच्या हंगामात ४२४ लाख क्विंटल उसाचे गाळप आणि १० टक्के वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. साखर कारखान्यांची क्षमता आणि उत्पादन वाढवण्यासोबतच सर्व सहकारी साखर कारखान्यांचे क्लस्टर तयार करून इथेनॉल प्लांट उभारण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. शहााबादच्या साखर कारखान्यात इथेनॉल प्लांट सुरू झाला आहे. पानिपतमध्येही इथेनॉल प्लांट लवकरच उभारण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here