मंत्र्यांनी दिले कारखान्यांच्या आधुनिकीकरणाचे निर्देश

249

चंदीगड : हरियाणा चे सहकार मंत्री डॉ. बनवारी लाल यांनी हरियाणा स्टेट फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव शुगर मिल्स लिमिटेड च्या अधिकाऱ्यांना कारखान्यांचे आधुनिकीकरण आणि इथेनॉल / सॅनिटाइजर, वीज ऊत्पादन गुऱ्हाळे स्थापित करण्याच्या शक्यतांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. मंत्री यांनी हरियाणा स्टेट फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव शुगर मिल्स लिमिटेड च्या अधिकाऱ्यां बरोबर बुधवारी बैठक घेतली होती. हरियाणा स्टेट फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव शुगर मिल्स लिमिटेड चे प्रमुख डायरेक्टर कॅप्टन शक्ति सिंह आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

डॉ.बनवारी लाल यांनी अधिकाऱ्यांना कारखान्याच्या कारभारात पारदर्शकता आणि मूल्य प्रभावी टेक्निक आणि माहिती तंत्रज्ञाना च्या उपयोगाला वाढवण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न करण्याचा आदेश दिला. बैठकीत त्यांनी सहकारी साखर कारखान्यांकडून संबंधीत विविध विषयांवर चर्चा केली. गाळप हंगाम 2019-20 च्या कामकाजाची समीक्षा, आवश्यक रिक्त पदे भरणे आणि इतर विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत निर्णय यावर चर्चा करण्यात आली. यादरम्यान शक्ती सिंह यांनी गाळप हंगाम 2019-20 बाबत सांगितले. ते म्हणाले की, COVID-19 महामारी असूनही सर्व कारखान्यांनी हंगाम 2019-20 दरम्यान गाळप यशस्वी केला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here