हरियाणा: नारायणगड साखर कारखान्याचा लवकरच गळीत हंगाम

अंबाला : नारायणगड साखर कारखान्याचा गळीत हंगाम नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र, शेतकऱ्यांना अद्याप गेल्या गळीत हंगामातील ऊस बिले मिळालेली नाहीत.

Tribuneindia.com मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये कारखान्याने ५० लाख क्विंटल उसाचे गाळप केले होते. नियमानुसार ऊस गाळप केल्यानंतर १४ दिवसांत त्याचे पैसे द्यावे लागतात. मात्र, तसे झाले नसल्याने नाराज झालेल्या शेतकऱ्यांनी आता गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी पैसे मिळावेत यासाठीचे नियोजन करण्यासाठी बैठक बोलावण्याची तयारी करीत होते. भारतीय किसान युनियनचे (चारुनी गट) प्रवक्ते राजीव शर्मा म्हणाले, गेल्या हंगामात साखर कारखान्याने १७२ कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या उसाचे गाळप केले आहे. जवळपास १०९.२५ कोटी रुपयांची ऊस बिले दिली आहेत. अद्याप ६३.०७ कोटी रुपये प्रलंबित आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना ३५.४८ कोटी रुपयांचे पोस्ट डेटेड चेकचा समावेश आहे. त्याशिवाय रोख २७.५९ कोटी रुपये येणेबाकी आहे. कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी २० नोव्हेंबरपासून गाळप सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्यापूर्वी हे पैसे मिळावेत अशी मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here