साखर कारखान्यात स्वछ ऊस आणल्यास हरियाणामध्ये शेतकऱ्यांना एक हजाराचे बक्षिस

शहाबाद साखर कारखान्यात स्वच्छ ऊस आणणाऱ्या शेतकऱ्यांना आता रोख रक्कम देऊन सन्मानित केले जाईल. तसेच त्या शेतकऱ्याचा फोटो कारखान्याच्या बोर्डावर कौतुकासह लावला जाईल. साखर कारखान्यात गुरुवारी हरियाणा ब्यूरो पब्लिक इंटरप्राइज वित्त विभागाचे वाइस चेयरमैन ललित बत्रा यांनी कारखान्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यांनी सांगितले की, सर्व अधिकारी आणि कर्मचारी कारखान्याच्या प्रगतीसाठी अधिक मेहनतीने काम करावे. जे शेतकरी कारखान्यात साफ ऊस आणतील त्यांना 1000 रुपये देऊन सन्मानित केले जाईल..

तसेच कारखान्यात शेतकऱ्यांसाठी चहापाणी आणि विश्रांतीची योग्य व्यवस्था केली जाईल. ते म्हणाले, काारखान्यात 60 केएलपीडी इथेनॉल प्लांटचे काम जोरात सुरु आहे. एका वर्षाच्या आत यामध्ये उत्पादनही सुरू होऊ शकेल. हा प्लांट कारखान्याचे आर्थिक ध्येय गाठण्यात सक्षम असेल. यावेळी चीफ इंजीनियर सुभाष उपाध्याय, मुख्य लेखाकार दीपक खटोर, केन मैनेजर जसविंद्र सिंह ढींढसा, अधीक्षक विश्वनाथ शर्मा, चीफ केमिस्टर दीपक कुमार गोयल व लैब इंचार्ज कर्ण सिंह सह कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ते म्हणाले, कारखान्यात वैक्यूम क्लीनर आधुनिक पार्ट लावला जाईल. अधिकारी म्हणाले, कारखान्याच्या मशीनरी चा अतिरिक्त पार्ट खरेदी करुन ठेवावा, जेणेकरुन कुठलाही पार्ट खराब झाल्यास लगेच बदलता येऊ शकेल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here