शाहाबाद : शाहाबाद साखर कारखान्यात बाहेरील ऊस व्यवस्थापकाची नियुक्ती केली जाऊ नये, अशी मागणी करत भाकियूच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आणि साखर कारखाना युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच साखर कारखान्याच्या संचालकांनी मुख्य लेखाधिकारी दीपक खटोल यांना निवेदन दिले. साखर कारखान्याच्या व्यवस्थापकांच्या नावे हे निवेदन देण्यात आली.
दैनिक ट्रिब्यूनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शाहाबाद सहकारी साखर कारखान्यात बाहेरून ऊस व्यवस्थापक नियुक्त करू दिला जाणार नाही, असा इशारा देण्यात आला. हरियाणा सरकारच्यावतीने शाहाबाद साखर कारखान्यात निवृत्त ऊस व्यवस्थापकांची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यास विरोध करत शेतकरी, कर्मचारी संघटना, कारखान्याचे संचालकांनी प्रशासनाच्या नावे निवेदन दिले. भाकियूचे प्रवक्ते राकेश बेस, विभाग अध्यक्ष हरकेश खानपुर, जयपाल चढनी, हाकम सिंह यांनी सध्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.
साखर कारखान्यात जी व्यक्ती नियुक्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ती व्यक्ती भ्रष्ट असल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्या व्यक्तीची चौकशीही सुरू असल्याचे सांगण्यात आले. यावेळी संदीप खरींडवा, देवी लाल खरींडवा, लखबीर सिंह खरींडवा, संचालक बलकार सिंह, धर्मवीर, सुरेंद्र कौर, रघबीर सिंह आदी उपस्थित होते.