हरियाणा पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे १५ नोव्हेंबरला बंदचे आवाहन

अंबाला : हरियाणा पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनने १५ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा ते १६ नोव्हेंबरच्या सकाळी ६ वाजेपर्यंत बंदचे आवाहन केले आहे. केंद्रीय उत्पादन शुल्कात कपातीच्या सरकारने अचानक केलेल्या घोषणेने पेट्रोल पंप मालकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. असोसिएशनचे वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष पलविंदर सिंह यांनी सांगितले की, आमचे कमिशन वाढवले जावे आणि उत्पादन शुल्कात अचानक कपात केल्याने आमच्या झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यात यावी. सिंह यांनी सांगितले की, पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे वितरकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आम्ही नुकसान भरपाईची मागणी करीत आहोत.

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे राज्य अध्यक्ष अनिल कुमार म्हणाले, आम्ही आमच्या अडचणींबाबत हरियाणा सरकारशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, कोणतेही उत्तर मिळालेले नाही. जर सरकारने आमचे म्हणणे ऐकले नाही तर आंदोलन करू. आम्ही इंधन खरेदी करणार नाही आणि विक्रीही थांबवली जाईल. ३ नोव्हेंबरला एका मोठ्या निर्णयानुसार केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये ५ रुपये आणि डिझेलमध्ये १० रुपये अबकारी कर कपात केली होती. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर अनेक राज्यांनीही पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट घटवला. त्यामुळे वितरकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here