चंदीगढ : कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्री जे. पी. दलाल आणि सहकार मंत्री बनवारी लाल यांनी संयुक्त रुपात विविध सहकारी साखर कारखान्यांच्या ऊसाच्या गाळपाचा, कारखान्यांच्या तयारीचा आढावा घेतला.
याबाबत ट्रिब्यून इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, या बैठकीवेळी साखर कारखान्यांसाठी ल्युब्रिकंट, कॉस्टिक सोडा आणि इतर साहित्य खरेदीची प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली. यावैळी बैठकीत साखर कारखान्यांसाठी ४.४७ कोटी रुपये खर्चून विविध साहित्य खरेदी करण्याच्या प्रक्रियेबाबत चर्चा करण्यात आली. कामाचा आढावा घेण्यात आला. जवळपास २.८४ कोटी रुपये खर्चून ल्युब्रिकंट आणि १.६३ कोटी रुपये खर्च करून कॉस्टिक सोडा खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली.