हरियाणा : ऊसावर टॉप बोरर किडीला नियंत्रित करण्यासाठी हीच योग्य वेळ

कर्नाल : कर्नाल येथील आयसीएआर – ऊस प्रजनन संस्थेच्या शेतकऱ्यांनी विभागातील ऊसाच्या शेतांमधील टॉप बोरर किडीला रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. वैज्ञानिकांनी शेतांमधील टॉप बोरर किडीची अंडी, पतंग आणि पूर्ण वाढलेली कीड मिळाली होती. गेल्या हंगामात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान करणाऱ्या या किडीला नियंत्रित करण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

ऊस संशोधन संस्थेचे प्रमुख डॉ. एस. के. पांडे यांनी सांगितले की, या स्तरावर किडीला नियंत्रित करणे शक्य आहे. आम्ही शेतकऱ्यांना सावध राहण्यास सांगितले आहे. संशोधकांनी सुचविलेले उपाय राबविण्याचा सल्ला दिला आहे ऊसाच्या CO-०२३८ ही प्रजाती या टॉप बोररसाठी अतिसंवेदनशील आहे. ही प्रजाती जवळपास ६०-७० टक्के क्षेत्र कव्हर करते. या प्रजातीची सुरुवात कर्नाल केंद्राकडून २००९ मध्ये सुरू करण्यात आली होती. २०१२ मध्ये हरियाणा, यूपी आणि पंजाबमधील जवळपास ९८ टक्के शेती कव्हर करते. शेतकऱ्यांनी एप्रिलच्या अखेरीस अथवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कॉलर ड्रिंचिंगच्या माध्यमातून क्लोरएन्ट्रानिलिप्रोल १८.५ एससी किटकनाशकाची फवारणी करावी, असे आवाहन त्यांनी केले. या किटकनाशकात १५० मिलीलिटसाठी ३०० लिटर पाणी मिसळून एक एकरसाठी त्याचा वापर करावा असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here