हरियाणा: रोहटक साखर कारखान्याचा साखर उत्पादनात द्वितीय क्रमांक

रोहटक : जिल्ह्यातील भाली आनंदपूर येथील Haryana Cooperative Sugar Mills Limited (Rohtak plant)ने १२ नोव्हेंबरपासन गळीत हंगाम सुरू करून आपल्या पूर्ण गाळप क्षमतेचा वापर करून साखर उत्पादनात राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. ट्रिब्यून इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कारखान्याने आतापर्यंत ३८.५५ लाक क्विंटल उसाचे गाळप करून ३.४५ लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे. कारखान्याची गाळप क्षमता ९७.५२ टक्के नोंदविण्यात आली आहे. साखर उत्पादनात कुरुक्षेत्रमध्ये शाहाबाद साखर कारखान्यानंतर रोहटक कारखाना द्वितीय क्रमांकावर आहे. रोहटक कारखान्याशी २२५ गावातील ६५०० शेतकरी जोडले गेले आहेत.

Tribuneindia.com मध्ये प्रकाशित वृत्तानुसार रोहटक कारखान्याचे उपायुक्त सह अध्यक्ष मनोज कुमार यांनी सांगितले की, आमच्या कारखान्याने देशात मेम्ब्रेन फिल्ट्रेशन तंत्रज्ञान वापरात द्वितीय स्थान गाठले आहे. त्याचा वापर करून सल्फरमुक्त साखरेचे उत्पादन केले जाते. यातून रसायनांचा वापर कमी केला जातो. तसेच गुणवत्ताही सुधारली जाते. अशा पद्धतीने कारखान्याची दैनिक गाळप क्षमता ३५००० क्विंटल आहे. दररोज १६ मेगावॅट वीजेचे उत्पादन केले जाते. या गळीत हंगामात ११.२५ कोटी रुपयांच्या १.७ कोटी युनीट विजेचे उत्पादन करण्यात आले आहे. याशिवाय, शेतकऱ्यांनी १८ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या काळात पुरवलेल्या उसापोटी २१.६७ कोटी रुपयांची बिले देण्यात आली आहेत. चालू हंगामात आतापर्यंत १०३.८२ कोटी रुपयांची बिले शेतकऱ्यांना दिली आहेत. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये दिले आहेत. कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रदीप अहलावत यांनी सांगितले की, पहिल्यांदाच कारखान्याने उत्पादन आणि क्षमता वापरात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. कारखान्याने यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here