हरियाणा : कर्नाल संस्थेचे शास्त्रज्ञांनी वाढवली उसाच्या रसाची शेल्फ लाइफ

कर्नाल : Sugarcane Breeding Institute Regional Centre (कर्नाल)ने ऊसाच्या रसाची शेल्फ जीवन ४ डिग्री सेल्सिअसने वाढविण्याची प्रक्रिया विकसित केल्याचा दावा केला आहे. पारंपरिक रेफ्रिजरेटरच्या तापमानावर ९० दिवसांपर्यंत वाढ मिळू शकते. संस्थेचे प्रमुख डॉ. एस. के. पांडे यांनी हे तंत्र विकसित केल्याच्या दाव्याला दुजोरा दिला आहे.

याबाबत द ट्रिब्युनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, संस्थेने सांगितले की, वैज्ञानिकांनी नव्या तंत्राचा आविष्कार केला आहे. त्यातून बाटलीबंद ऊसाचा रस साठवणुकीला चालना मिळणार आहे. हंगाम सुरू नसताना ऊसाच्या रसाची उपलब्ध होणे सुलभ होणार आहे. पांडे म्हणाले की, प्लांट फिजिऑलॉजीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पूजा धांसू यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हे संशोधन केले आहे. त्यांनी ज्युस पॅकेजिंगवर काम सुरू केले आहे. लवकरच हा ज्युस संस्थेच्या सेल काऊंटरवर ऑफ सिझनमध्येही उपलब्ध होईल.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ऊसाचा रंग हिरव्यापासून फिक्कट स्वरुपात बदलल्याने तो लवकर खराब होतो. त्यामुळे याच्या खपावर परिणाम होतो. संशोधकांनी केवळ शेल्फ लाइफ बदलली नसून स्वाद, सुगंध आणि रंग जसाच्या तसा टिकवण्यात यश मिळवले आहे असा दावा त्यांनी केला. पांडे म्हणाले की, या प्रक्रियेमुळे छोट्या प्रमाणातील ज्युस उद्योगात क्रांती होईल. कारण, जेथे पिकाचे उत्पादन होत नाही, अशा ठिकाणी चांगल्या गुणवत्तेचा उसाचा रस उपलब्ध होऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here