साखर कारखान्यातील कर्मचारी कोरोना पॉजिटीव

कुरुक्षेत्र: साखर कारखाने सातत्याने पूर्ण कष्ट आणि नियमांचे पालन करत हॅन्ड सॅनिटाइजर च्या उत्पादनात उतरली आहेत. पण आता कोरोनाने साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याभोवती आपला विळखा घट्ट केला आहे.

कुरुक्षेत्र चे डेप्युटी कमिश्नर (डीसी) धीरेंद्र खडगटा यांनी सांगितले की, शाहबाद कारखान्यातील 52 वर्षीय पुरुष कर्मचारी कोरोना पॉसिटिव निष्पन्न झाला. त्यांनी सांगितले, आम्हाला शुक्रवारी पीजीआई, चंडीगढ़ येथून शाहबाद कारखाना कॉलनी येथील रहिवासी कोरोना पॉजिटिव होण्याची सूचना मिळाली. साखर कारखाना कॉलोनीमध्ये जवळपास 150 घरे आहेत आणि या क्षेत्राला सील केले आहे. जवळपास 100 एकर मध्ये पसरलेल्या साखर कारखाना परिसर सील करून बफर क्षेत्र घोषित केला आहे.

कुरुक्षेत्र चे सिविल सर्जन डॉ.सुखबीर म्हणाले, शाहाबाद कारखान्यातील 52 वर्षीय व्यक्ति ला दमा आहे आणि तो पीजीआईएमईआर (चंडीगढ़) येथून नियमित उपचार घेत होता. अलीकडेच, हा कर्मचारी गुरुवारी उपचारासाठी पीजीआईएमईआर आला होता, तिथेच डॉक्टरांनी कोरोना वायरस परीक्षणासाठी त्याचा स्वाब नमूना घेतला आणि तो शुक्रवारी पॉजिटिव आला. डॉ. सुखबीर म्हणाले, आम्ही या रुग्णच्या परिवारातील 6 सदस्यांसह 15 जवळच्या लोकांचा शोध घेतला आहे. सर्वच 15 व्यक्तीचे नमूने शुक्रवारी कोरोना परिक्षणासाठी पाठवले. शाहाबाद कारखाना कॉलनी मध्येही डोर-टू-डोर सर्वेक्षण सुरु केले आहे.

शाहाबाद कारखाान्याच्या क्रियाकलाप बाबत माहिती देताना खडगटा म्हणाले, उपलब्ध साधनांना साफ करुन साखर कारखाना बंद केला जाईल. कारखान्याला ३-४ दिवसांसाठी बंद ठेवण्यात येईल आणि या वेळे दरम्यान कारखाना परिसराचे सैनीटाईजेशन केले जाईल. कारखाना बंद झाल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांचे स्वॅब कोरोना परिक्षणासाठी घेतले जातील. कर्मचाऱ्यांच्या रिपोर्ट नुसार कारखाना बंद ठेवणे किंवा सुरु ठेवणे याबाबत पुढे निर्णय घेतला जाईल.

जर सर्व परीक्षण केलेल्या कर्मचाऱ्यांचे कोविड -19 चे निगेटिव रिपोर्ट आले तर, आम्ही सशर्त कारखाना सुरु ठेवण्यास परवानगी देऊ.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here