हरियाणा: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची निदर्शने; उपायुक्तांना निवेदन सादर

रोहतक : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रलंबित समस्यांबाबत किसान सभेने भाली आनंदपूर साखर कारखाना आणि उपायुक्त कार्यालयासमोर निदर्शने केली. या मागण्यांची पूर्तता लवकरात लवकर केली जावी अशी मागणी करण्यात आली. जर मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर नाईलाजाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला.

याबाबत अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, किसान सभेचे महासचिव सुमित दलाल यांनी सांगितले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी भाली साखर कारखाना योग्य रित्या सुरू नाही. अनेक तास कारखाना बंद असतो. त्यामुळे गाळप पूर्ण होत नसल्याचे दिसते. शेतकऱ्यांना नाईलाजाने आपला ऊस पानीपतला घेऊन जावा लागतो. यातून शेतकऱ्यांचा खर्च, वेळ वाढतो. याशिवाय ट्रॉली घेवून जाताना अपघातांचाही धोका आहे. शेतकऱ्यांचा हा ऊस खरेदी केंद्रांवर स्वीकारून तेथून दुसऱ्या कारखान्यांना पाठवला पाहिजे. तर शेतकऱ्यांना धोका पोहोचणार नाही. यावेळी जिल्हा उपायुक्तांनी कारखाना प्रशासनाशी चर्चा करून लवकर या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. किसान सभेचे जिल्हाप्रमुख प्रीत सिंह, सुनील मलिक, बीकेयूचे भूप टिटोली, रणधीर धामड, बबलू उन, गांधी टिटौली, जय भगवान ककराना, टेकराम, वीरेंद्र, परदीप, सुधीर, राजपाल, नरेश, सुमेश, कुलबीर, नरेंद्र, मुकेश, नरेश आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here