हरियाणा: ऊसाचे पैसे थकल्याने ऊस उत्पादक शेतकरी संतप्त

अंबाला : उसाचे बिल मिळण्यास उशीर होत असल्याने नारायणगढ येथील शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतकरी नेत्यांनी नारायणगड येथे मोठे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय किसान युनीयनचे (चारुनी) प्रवक्ते राजीव शर्मा यांनी सांगितले की, नारायणगड साखर कारखान्याने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गाळप हंगाम सुरू केला. कारखान्यांने या हंगामात १०५ कोटी रुपयांच्या उसाचे गाळप केले आहे. पण आतापर्यंत फक्त ९.४५ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. निकषानुसार ऊस खरेदी केल्यानंतर १४ दिवसांत शेतकऱ्यांना पैसे देणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे आम्ही नारायणगडमध्ये आंदोलन अथवा मेळावा आयोजित करू शकत नाही. त्यामुळे पैसे मिळण्यासही उशीर झाला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here