पानीपत : गळीत हंगामाच्या उद्घाटनानंतर चार दिवसातच पानीपत सहकारी साखर कारखान्यामध्ये ऊस आवक कमी झाल्याने कामकाज विस्कळीत झाले आहे. कारखान्यात गेल्या चार दिवसांत ४२,५०० क्विंटल उसाची आवक झाली. कारखान्याची क्षमता ५०,००० क्विंटल प्रती दिन आहे. सहकार राज्यमंत्री बनवारी लाल यांनी खासदार संजय भाटीया यांच्या उपस्थितीत १५ नोव्हेंबर रोजी गळीत हंगामाचे उद्घाटन केले होते.
याबाबत दी ट्रिब्यूनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी चालू हंगामात ६७ लाख क्विंटल उसासाठी जिल्ह्यातील ३५६७ शेतकऱ्यांशी करार केला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की शेतकऱ्यांना दोन लाख क्विंटल ऊसाच्या पावत्या वाटप केले आहे. मात्र, ऊस आवक क्षमतेइतकी सुरू नाही. त्यामुळे अडचणी येत आहेत. प्लांट पूर्ण क्षमतेने सुरू झाला नाही तर बगॅसचे नुकसान होईल. याशिवाय साखर उताराही कमी होण्याचा धोका आहे.
प्रसार माध्यमांतील वृत्तानुसार, अधिकारी उसाच्या योग्य आवकेच्या प्रतीक्षेत आहेत. कारण पूर्ण स्टॉक असेल तर कारखाना चांगला सुरू राहू शकतो. प्लांटमध्ये २८ मेगावॅटचे टर्बाईन आहे. प्लांट पूर्ण क्षमतेने चालण्यासाठी युएचबीवीएनला २१ मेगावॅट विजेचा पुरवठा केला जाणे अपेक्षित आहे.
पानीपत सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक नवदीप सिंह यांनी सांगितले की, तोटा कमी करण्यासाठी आम्ही २२ नोव्हेंबरनंतर प्लांट पूर्ण क्षमतेने चालविण्याचा विचार करीत आहोत. कारखान्यात आतापर्यंत केवळ ४२,००० क्विंटल ऊस आला आहे. हा खूप कमी आहे. कारखाना योग्य पद्धतीने चालविण्यासाठी किमान चार दिवसांच्या स्टॉकची गरज आहे. कामगारांची टंचाई असल्याने ऊस कमी येत आहे. शेतकरी गव्हाची पेरणी आणि भाताच्या कापणीत गुंतले आहेत. २२ नोव्हेंबरनंतर ऊस आवक वाढेल आणि प्लांट पूर्ण क्षमतेने सुरू राहील असे ते म्हणाले.