हरियाणा: दोन साखर कारखान्यांना तंत्रज्ञानातील दक्षता पुरस्कार

चंदीगड : कर्नाल येथील सहकारी साखर कारखान्याला ऊस प्रक्रिया क्षेत्रातील उत्कृष्ट विकासात्मक कार्यासाठी प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय, कैथल येथील सहकारी साखर कारखान्याला २०१९-२० या गळीत हंगामात राष्ट्रीय स्तरावरील आपल्या तंत्रज्ञान दक्षतेमधील कार्यासाठी पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे.

हरियाणातील सहकार मंत्री बनवारी लाल यांनी सांगितले की, या कारखान्यांना वडोदरामध्ये (गुजरात) २७ आणि २८ मार्च रोजी होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार वितरण सोहळ्यात सन्मानित केले जाईल. याचे आयोजन नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर मिल्सने केले आहे.

मंत्री बनवारी लाल म्हणाले, २ मार्चपर्यंत सर्व सहकारी साखर कारखान्यांनी ९२०.८० कोटी रुपये खर्चून २६३.२० लाख क्विंटल ऊस खरेदी केला आहे. त्यापैकी ४७४.४४ कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले. याशिवाय, सरकारने गळीत हंगाम २०२०-२१ मधील ऊसाचे उर्वरीत पैसे देण्यासाठी १३७.५१ कोटी रुपयांचे अर्थसाह्य उपलब्ध करून दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here