हरियाणा: कर्नाल साखर कारखान्यात ३० मार्चपासून चाचणी शक्य

कर्नाल : परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दीर्घ काळाची प्रतीक्षा संपणार आहे. कारण नवा कर्नाल सहकारी साखर कारखान्यात ३० मार्चपासून उसाची चाचणी घेण्यात येणार आहे. कारखान्यातील मशिनरीच्या इन्स्टॉलेशनचे काम अंतिम टप्प्यात आहे. गळीत हंगाम ३० मार्चपासून सुरू होणार असून त्यासाठी चाचणी ३० मार्च रोजी निश्चित करण्यात आली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, कर्नालचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदिती यांनी सांगितले की, कारखान्याची क्षमता २२०० टीसीडी पासून वाढवून ३५०० टन टीसीडी प्रतिदिन करण्यात आली आहे. नंतर त्याची क्षमता ५००० टीसीडीपर्यंत वाढविली जाईल.
कारखान्याची गाळप क्षमता वाढविल्यानंतर कार्यक्षेत्रातील सुमारे ८ ते १० लाख टन जादा ऊस उपलब्ध होणार आहे. हा ऊस सध्या कारखान्याची कार्यक्षमता कमी असल्याने इतर साखर कारखान्यांकडे पाठवला होता. आता हा ऊस इतर कारखान्यांना पाठविण्याची गरज भासणार नाही. कारण, कारखान्याकडे कार्यक्षेत्रातील पूर्ण ऊस गाळपाची क्षमता आहे. याशिवाय कारखाना १८ मेगावॅट विजेचे उत्पादन करू शकेल. त्यातून कारखान्याचे उत्पन्न वाढणार आहे.

याशिवाय, कारखाना सुरू झाल्यावर शुद्ध साखरेचे उत्पादन सुरू होईल. सद्यस्थितीत आम्ही दररोज सुमारे ३.५ लाख क्विंटल पारंपरिक साखरेचे उत्पादन करीत आहोत. मात्र, कारखाना सुरू झाल्यानंतर आम्ही चार लाख क्विंटल शुद्ध साखरेचे उत्पादन करू शकतो असे मुख्य कार्यकारी अधिकारी आदिती यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here