हरियाणात लवकरच ऊस दर निश्चिती करणार: कृषी मंत्री

चंदीगढ : शेतकऱ्यांचे हीत लक्षात घेवून लवकरात लवकर ऊस दर निश्चित केला जाईल, असे हरियाणाचे कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्री जे. पी. दलाल यांनी सांगितले. शेतकऱ्यांना शंभर टक्के ऊस थकबाकी अदा करण्यात आली आहे. फक्त एका कारखान्याने पैसे थकवले आहेत. त्यांनाही बिले देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत, असे ते म्हणाले. कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्र्यांनी चंदीगढमध्ये ऊस नियंत्रण बोर्डाची आढावा बैठक घेतली. यावेळी सहकार मंत्री डॉ. बनवारी लाल, कृषी तथा शेतकरी कल्याण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुमिता मिश्रा उपस्थित होते.

पंजाब केसरीमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कृषी मंत्र्यांनी सांगितले की, शाहबाद साखर कारखान्यात ६० केएलपीडी क्षमतेचा इथेनॉल प्लांट उभारण्यात आला आहे. आणि पानीपत साखर कारखान्यात ९० केएलपीडी क्षमतेचा प्लांट लवकरच स्थापन केला जाईल. शिवाय रोहटक, कर्नाल, सोनीपत, जींद, कॅथल, महम, गोहाना व पलवल येथील साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल प्लांट स्थापन करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी उसाची १५०२३ ही नवी प्रजाती प्रसारीत करण्यासाठी तयार केली आहे. तिचा स्वीकार केंद्र सरकारने केला असून हरियाणा कृषी विद्यापीठाकडून हिस्सारमध्ये त्याची पडताळणी सुरू असल्याचे मंत्र्यांनी सांगितले. या प्रजातीच्या प्रसारासाठी हरियाणा सरकार शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करेल असे मंत्री म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here