हरियाणा : टॉप बोरर किडीचा हल्ला, ऊस उत्पादनावर परिणाम

मोठे नुकसान झाले आहे. या किडीच्या हल्ल्यामुळे कृषीतज्ज्ञ, साखर कारखान्यांसह किटकनाशक उत्पादक कंपन्या, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या दोन वर्षापासून या किडीला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या किटकनाशकाचा वापर फारसा उपयोगी पडला नसल्याचे ऊस तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे १५ फेब्रुवारी ते १५ मार्च या काळात लागण होणाऱ्या ऊसाआधी कर्नालच्या ऊस संशोधन संस्थेने संशोधकांच्या उपस्थितीत चर्चासत्राचे आयोजन केले आहे.

याबाबत द ट्रिब्यूनमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, विविझ ठिकाणी दौरा केल्यानंतर ICAR-Sugarcane Breeding Instituteचे विभागीय केंद्र प्रमुख डॉ. एस. के. पांडे यांनी ऊस विषयातील तज्ज्ञ, कंपनीच्या सदस्यांसोबत चर्चा केली. टॉप बोरर किडीमुळे उसाचे जवळपास ६० टक्के नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. या किडीचा प्रभाव ९५ टक्के क्षेत्रावर पडला आहे. किडीचे निसर्गचक्र तोडण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. राज्यातील जवळपास ३.५ लाख एकरात ऊस शेती केली जाते. सरासरी उत्पादन ५००-५०० क्विंटल प्रती एकर आहे. मात्र, किडीमुळे उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. सरासरी १४०-२०० क्विंटल प्रती एकर उत्पादन होत असल्याचे डॉ. पांडे म्हणाले.

सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या को ०२३८ या प्रजातीला या किडीचा फटका बसल्याने संशोधक चिंतेत आहेत. त्यामुळे राज्यात या प्रजातीची लागण ७० टक्के क्षेत्रात केली गेली आहे. ही अधिक उत्पादन देणारी जात आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर याची लागवड केली आहे. मात्र, सध्या आपल्याकडे याबाबत कोणतीही उपाययोजना नाही असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here