उस तोडणी मजुरांसाठी मोफत वैद्यकीय शिबिर संपन्न

कोल्हापूर : प्रतिनिधी
प्रतिवर्षीप्रमाणे कसबा बावड्यात संत भगवान बाबा यांच्या 55 व्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या दिवसाचें औचित्य साधून छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या वाहनतळावर उस तोडणी कामगारांसह इतरांचीही मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

यावेळी भगवान बाबा यांचे प्रतिमापूजन करुन कसबा बावडा हनुमान मंदिरापर्यंत पालखी सोहळा झाला. दिवसभर तात्याबा सामाजिक प्रतिष्ठानतर्फे महा आरेाग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरात मोफत कान, नाक, घसा, हृदयरोग, पोटविकार, कंबर, मान, पाठदुखी, रक्तदाब, मधुमेह, नेत्ररोग अशा आजारांचे निदान व त्यावरील मोफत उपचारही करण्यात आले.

शिबिराचा 395 जणांनी लाभ घेतला. 187 रुग्णांची नेत्र तपासणी केली. मोफत शस्त्रक्रियेसाठी 27 जणांची सोय करण्यात आली. लायन्स चे संचालक नंदकुमार सुतार, नगरसेवक अशोक जाधव, सुभाष बुचडे, कारखाना चेअरमन सर्जेराव माने, चाटे शिक्षण संस्थेचे प्रा भारत खराटे, संजय नांद्रेकर, बाबासाहेब वांगर, अशोक बांगर आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here