श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यातर्फे ऊस तोडणी कामगारांची आरोग्य तपासणी

पुणे : दौंड तालुक्यातील पाटोदा येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यावर ऊस तोडणी कामगार, वाहतूकदारांची आरोग्य तपासणी करण्यात आली. याचा लाभ १६३ कामगारांनी घेतला. साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या निर्देशानुसार, कारखान्याच्या ऊस गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये ऊस तोडणी, वाहतुकीसाठी आलेल्या मजुरांचे हंगाम कालावधीमध्ये तीन टप्प्यांत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.
यावेळी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एम. रासकर म्हणाले की, कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांच्या सूचनेनुसार तसेच सरकारच्या आदेशानुसार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. निवासी डॉक्टर दीपक गजरे यांची नेमणूक केलेली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र राहूच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. पूजा चिंचोलीकर, डॉ. जयप्रकाश हूड, आरोग्य सेविका रत्नमाला ठाकरे, उषा सावके, मीनाक्षी शिंदे, जनाबाई शिरसाट, आरोग्य सेवक, विनायक वांडरे, जितेंद्र शेंडगे, बापू झिटे, प्रयोगशाळा अधिकारी गौरी गव्हाणे यांनी सहभाग घेतला. राहू प्राथमिक आरोग्य केंद्राने सहकार्य केलेले आहे. कारखान्याचे केन मॅनेजर एस. बी. टिळेकर, शेती अधिकारी एस. बी. शेंडगे, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here