कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत आरोग्य मंत्र्यांचे राज्यसभेत निवेदन

चीनमध्ये कोरोना विषाणूची लागण आणि केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांबाबत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज राज्यसभेत निवेदन दिले.

चीनमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 636 जणांचा मृत्यू झाला असून, 31 हजार 161 लोकांना याची लागण झाली आहे, असे ते म्हणाले. देशात केरळमध्ये कोरोना विषाणूचे तीन रुग्ण आढळले आहेत. ते चीनमधल्या वुहान इथून आले होते. त्यांना स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी सरकार अनेक उपाययोजना करत आहे. आपण देखील परिस्थितीचा दररोज आढावा घेत आहोत, असे ते म्हणाले. चीनमधून येणाऱ्यांना सध्याचा व्हिसा आता वैध असणार नाही. तसेच लोकांना चीनचा प्रवास टाळण्याच्या सूचना देण्यात आल्याचे ते म्हणाले.

दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरुसह देशातल्या 21 विमानतळावर तसेच बंदरांवर प्रवाशांची तपासणी केली जात आहे.

भारतीय दूतावास आणि उच्चायुक्त चीनमधील भारतीय समुदायाच्या नियमित संपर्कात आहेत.

सरकार नियममिपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलत आहे, असे ते म्हणाले.

(Source: PIB)

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here